गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

कारण की वाढदिवस,केक आणि हिमरू साडी 

#latepost 

कारण की,आज आंबेडकर जयंती आहे त्यानिमित्ताने.

कारण की, आज बहुतेक राज्यांमध्ये हिंदू नववर्ष सुरू होतेय.

कारण की, आज हनुमान जयंती आहे.

कारण की, आज रमजान महिन्याचा पहिला दिवस आहे.

कारण की, आज माझा वाढदिवस आहे.

(कसलं नशीब घेऊन जन्माला आले ना ! ) 

जगात तुमचा वाढदिवस कोणी आठवणी ठेवो अथवा न ठेवो, कुणाच्या आठवणीत राहून न राहो

 पण याच जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी तुमचा वाढदिवस जंगी साजरा होतो तो म्हणजे, 

जीवाभावाचे व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुक !! 


अतिशय सुरेख गार्डन थीम्स चे डेकोरेशन केलेला आइसिंग केक मिळाला. (केक वैगेरे कापून साजरे केलेले वाढदिवस तुरळकच)

कारण की एवढा छान केक कापणं,followed by फोटो सेशन मग साडी नेसण आलच.

कारण की मी हिमरु साडी नेसलीय.

कारण की ही साडी आमच्या मराठवाड्यात तयार होते.

कारण की मराठवाड्यात माझे माहेर आहे.

कारण की माहेरची काडी बायकांना सासरच्या माडी पेक्षाही प्रिय असते आणि ही तर माहेरची साडी आहे.

तर आज या हिमरू साडी विषयी.

हिमरू साडी औरंगाबाद च्या आसपास विणली जाते. मोहम्मद तुघलकाच्या काळात जेव्हा त्याची राजधानी त्याने दिल्लीवरून दौलताबादला हलवली त्याच काळात हिमरू साडीचा जन्म झाला. पुढे मुघलांच्या काळात अजूनच नावारूपास हे हातमाग वस्त्र येत गेलं.

हिमरुचा या शब्दाचे मूळ "हम -रूह" मध्ये सापडते याचा अर्थ सारखेपण, साम्य.

हे साम्य,सारखे पण कशा सोबत तर पर्शियन नक्षीकामासोबत.

पर्शियन नक्षीकामाची छाप जशीच्या तशी हिमरू विणकामात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे मी म्हणेन.राज घराण्यांत सोन्या-चांदीच्या तारांमध्ये या कापडाचे साडीचे विणकाम होत होते. राजघराण्याशी संबंधित असलेली हे कापड, साडी पुढे- पुढे एक धागा रेशीम व एक धागा सुत अशी विणली जाऊ लागली तेव्हाच ते जनसामान्यांच्या आवाक्यात आले असणार.

उत्तरेतील बनारस साडीत दिसून येणारी किंख्वाब, शिखरगा,खडीयल, तांचोई प्रकारची ची नक्षी साडीवर, शालीन वर दिसून येते.

वजनाने अतिशय हलकी पण त्यात बरोबर राजेशाही अविर्भाव मनात जागी करणार्या या साडीच्या मी प्रेमात आहे.

©️ सुलभा जाधव








१३ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर केक ...तुझी फुलांची आवड ,तू ,साडी आणि तुझे लिखाण!!👌👌👌

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. दीदी,अग आळस आहे जरा तो झटकून लिहून ठेवव म्हणतेय
      धन्यवाद असेच प्रोत्साहन देत रहा

      हटवा
  2. खूप सुंदर लेख....आणि हिमरू साडी पण

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर लेख....आणि हिमरू साडी पण

    उत्तर द्याहटवा
  4. खरच केक आवरननीय आहे, त्यात तू घातलेली ही हिमरू साडी, सतत हसरा चेहरा व तुझे लिखाण सर्व कांही खूप manbhavk आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर, लिखाण, साडी,केक आणि तू ही

    उत्तर द्याहटवा
  6. खूपच सुंदर👌👌👌

    एक मुलगा असतो. त्याला निसर्ग वर्णन करायला, लिहायला आवडायचं. तो त्यासाठी संधी शोधायचा. एकदा वर्गात गुरुजींनी निबंध लिहायला सांगितला. पण विषय होता 'गाय'. ह्या मुलांनं मग लिहिलं "एक गाय होती. ती नदीकिनारी झाडाला बांधली होती. तिथलं वातावरण निसर्गरम्य होतं"... आणि पुढं मग पूर्ण निबंध निसर्गाचं वर्णन लिहिलं ...

    तुमचं'साडीप्रेम'ही असंच काहीसं आहे😆👍

    उत्तर द्याहटवा