रविवार, १० जानेवारी, २०२१

छप्पन भोग

*छप्पन भोग*



२००९-१० मध्ये मी ओडीशा राज्यांत वास्तव्या साठी आले.आजचे ओडीशा आणि दहा वर्षापुर्वीचे ओडीशा यात जमीनआसमानाचे अंतर आहेनवीन ठिकाण बघणेनवीन ठिकाणी रहायला जाणे तिथल्या गोष्टी नव्या नजरेने बघणेशिकणेयाची मला मुळातच आवड असल्याने  खाण्यापिण्यातचेही फारसे सोपस्कार नसल्यामुळे इथे जुळवून घेणे फारसे अवघड गेले नाही

आगळ्यावेगळ्या प्रातांत जावून पुढची बरीच वर्ष रहायचे म्हटल्यावर मनाची तयारी झालीच होतीओघाने  येणारे बदल व अडचणी गृहित धरल्यामुळे पश्चिम भारतातून पूर्व भारतात स्थिरावत असताना हवामान सोडलं तर बाकी गोष्टीं सोबत मजेत जुळवून घेत होतो.(हवामानाशी जुळवून घ्यायला खरच खूप त्रास झाला.)


नवनवीन गोष्टी बघायला मिळत होत्याइकडे स्थिरावत असताना बऱ्याच गोष्टी लक्ष वेधून घेत होत्या त्यात विशेष करूनइथल्या खाद्य संस्कृतीने लक्ष वेधून घेतले४८५ किमीएवढा विस्तीर्ण समुद्र किनारा या राज्याला लाभलेला आहेआंध्र प्रदेश,पश्चिम बंगालछत्तीसगडझारखंडबिहार या राज्यांशी जोडलेल्या सीमाभात हे मुख्य मुख्य पीक६७८० स्क्वे.किमीइतके घनदाट जंगल त्यात राहणारे ६२ आदिवासी जमाती त्यात १३ PVTGs, अशा अनेक घटकांची छाप इथल्या खाद्यसंस्कृतीत दिसून येते.

मानवाच्या आवडीनिवडीचा प्रभाव त्यांच्या श्रद्धा स्थानांवरदेव-दैवतांच्या पूजार्चांवर वर दिसून येतो.ओडिशाला प्राचीनमंदिरांचा एक वैभवशाली इतिहास आहेइथल्या मंदिरातील देव-देवतांना दररोज जो नैवेद्य दाखवला जातो त्याला भोग असे म्हणतातइथल्या प्रत्येक मंदिराच्या भोग ची विशिष्ट अशी चव आणि खासियत आहेपुरीच्या महाप्रभू जगन्नाथानां तर दररोज  चुकता शब्दशछप्पन पदार्थांचा भोग चढवला जातोहा छप्पन भोगाचा नैवेद्य देवाला चाखवल्या नंतर भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटण्यात येतो.

महाप्रभूचां मुदपाकखाना आणि भक्तानां वाटण्यात येणारा हा छप्पन भोगाचा महाप्रसाद ही मोठी उलाढाल तर आहेचसोबत यात मंदीरांचे अर्थकारणही गुंतलेले आहे.

आज मी तुम्हाला पुरीच्या महाप्रभू जगन्नाथांच्या छप्पन भोगाची ची गोष्ट सांगते.

प्रभू जगन्नाथ हे विष्णूचे रूप समजले जातेपुराणांमध्ये अशी एक कथा सांगितली जाते की,

पावसाची इंद्र देवता जेव्हा गोकूळावर कोपली   इंद्रदेवतेने केलेल्या अतिवृष्टीमुळे गोकुळ अक्षरशः पाण्यात बुडू लागतेतेव्हा श्रीकृष्ण आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतात आणि गोकुळतली सर्व जीवसृष्टी गोवर्धन पर्वताखालीआश्रयासाठी गोळा होते.ज्या श्रीकृष्णाला दिवसाकाठी आठ वेळा जेवायची सवय असते ते श्रीकृष्ण सात दिवसअन्नपाण्याविना गोवर्धन पर्वत करंगळीवर घेऊन उभे असतातसातव्या दिवशी इंद्राचा रुद्रावतार शांत होतो  गोकुळावर कोसळणारा मुसळधार पाऊस थांबतोतेव्हा समस्त गावकरी आनंदाने नाचू-गाऊ लागतात  त्याच आनंदाच्या भरात श्रीकृष्णासाठी सात दिवसांचे आठ ह्या हिशोबाने छप्पन पदार्थ शिजवून जेवू घालताततर अशी ही छप्पन भोगाची गोष्ट!

हिंदू धर्मात चारधामांचे महत्त्व आहे या चारधामांशी निगडित एक अख्यायिका सांगितली जाते ती अशीभगवान विष्णू रामेश्वरमला स्नान करतातजगन्नाथ पुरीला अन्नग्रहण करतातबद्रीनाथला ध्यान करायला बसतात आणि द्वारकेला जाऊन झोपतातया तर्कानुसार ही पुरी या तीर्थक्षेत्री अमळ अन्न शिजत असते यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाहीतरीच इथले लोक अभिमानाने सांगत असतात जगन्नाथ पुरीत तुम्हाला उपाशी माणूस भेटणार नाही.

देवाला दिवसाला सहा वेळात विभागून छप्पन भोगाचा नैवेद्य दाखवण्याचे एक वेळापत्र आहे.

.सकाळी साडेआठच्या दरम्यान गोपाळ वल्लभ भोग.

.सकाळी दहाच्या वेळी सकाळचे धूप भोग.

.सकाळी आकरा वाजता भोग मंडप भोग

.दुपारी साडेबारा ते एक वाजता माध्यान्ह धूप भोग.

.सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान संध्या धूप भोग.

.बड़ा श्रृंगारा भोग रात्री आकरा वाजतात्यानंतर महाप्रभू जगन्नाथ निद्रस्त होतात.


प्रभु जगन्नाथाच्या प्रसादासाठी स्वतंत्र असे मंदिराचे स्वयंपाक घर आहे.त्याचा सगळा स्वयंपाक रांधण्याचे एक शास्त्र आहेविशिष्ट असे नीतिनियम पाळून हा सगळा स्वयंपाक रांधण्यात येतोसगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नैवैद्यात कांदा लसुन याचा वापर करत नाहीत.महाप्रभूंच्या प्रसादाचा स्वयंपाक रांधत असताना त्या पदार्थांमध्ये मन जावू नये त्याचा सुवास घेणं म्हणजे सुद्धा अन्न उष्टावणे या धारणेने स्वयंपाकी त्याच्या नाकावर पंचा बांधतात तो नैवेद्य महाप्रभूनां दाखवताना पंडा (पूजारीसुद्धा नाकाला पंचा बांधून नैवेद्य दाखवत असतो


तर हे छप्पन पदार्थ कुठले?

तांदळा पासून बनलेले पदार्थ

अन्न-  पाण्यात शिजवलेला साधा भात

कनिका - गण्याचा गुरगुट्या भाततूप आणि साखर

.दही पाखाल - पाण्यात घालून ठेवलेला भात त्यात दही

.थाली खिचडी - शक्यतो मुगाच्या डाळीची तूप घालून केलेली खिचडी 

आदा पखाल-शिजवलेला साधा भात

त्यात अद्रक आणि पाणी.

घीय अन्नतुपात शिजवलेला भात मिसळा

खिचडी - साधी नेहमीची खिचडी

मिठा पखाल  - शिजलेला भात साखर आणि पाणी

ओडिया पखाल - शिजलेला पाणी भाततूपलिंबू आणि मीठ 

डाळीची आमटी आणि भाज्या

१०.डालामा 

११.बेरी डाली

१२.मुग डाली

१३उडद दाली

१४डाली

१५साग

१६.रायता

१७.बैंगनी

१८दही बैंगन 

१९.खट्टा 

२०.महूर

२१.पित्ता 

२२पटोल रस

२३बेसर

दुधापासून बनवलेले पदार्थ

२४.खीरी - 

२५.पापुडी -

२६.खुआ -

२७.रसाबाली - 

२८.तडिया - 

२९.छेना खाई - 

३०.बापूडी खजा -

३१.खुआ मंडा - 

३२.सारपुल्ली - 

पिठा आणि मंडा

(छेना म्हणजे पनीरओले खोबरेगव्हाचे पीठरवामैदासाखरेचा पाक यापासून बनवलेले गोड पदार्थ)

३३सुर पीठा - 

३४चडाई लाडा -

३५.झिल्ली - 

३६.कांती - 

३७.मंडा-

३८.अमळू -

३९.पुरी -

४०.लूची - 

४१.दही बारा - 

४२.बारा -

४३.अरीसा - 

४४.त्रिपुरी-

४५.रोसापाईक - 

४६.खाजा -

४७.गाजा - 

४८.लाडू - 

४९.जीरा लडू

५०.मगजा लडू

५१.माथापुली - 

५२.खुरुमा - 

५३.जगन्नाथ बल्लाव -

५४.काकरा - 

५५.लूनी खुरुमा - 

५६.मारीची लाडू - 

तुम्हाला प्रश्न पडला असेल या यादीत उडिया जनमानसाचा प्राणप्रिय रशगुल्ला कसा नाही.

जग्गनाथ महाप्रभु रसगुल्ला खात नाहीत का?

खातात ना ! एका अतिविशिष्ट प्रसंगी ते रसगुल्ला नैवैद्य म्हणून प्राशन करतात.

तर या नैवैद्य रशगुल्ल्याची एक मजेशीर गोष्ट आहेती पुढच्या भागात.


 क्रमशः

1 टिप्पणी: