Tuesday, January 19, 2010

‘इडली, ऑर्किड आणि मी’, आणि ‘मी’!
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुरी-कोणार्क असा सहलीचा योग जूळून आला. ओरिसात पर्यटनाला चांगलाच स्कोप आहे. घरातून बाहेर पडलं, रस्त्याला लागलो की दुतर्फा निर्सग सौंदर्य. मात्र खराब रस्ते आणि राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या गैरसोयी यामुळे पुरी- कोणार्क शिवाय फारसं टूरीझम येथे वाढलेलं दिसत नाही.

आम्ही पुरी- कोणार्क वारी केलेली होती. अनुभवावरुन आम्ही नाश्ता करून मगच कोणार्कला जाण्याचा बेत आखला. कारण कोणार्क मंदिराच्या जवळ एकही ठीकठाक रेस्टॉरंट नव्हतं. विश्वास नाही ना बसत! पण ही मागच्या तीन महिन्यापर्यंतची फॅक्ट होती.

आता चित्र बदललेलं आहे. कोणार्क मंदिरा जवळ ‘कामत’ उघडलेलं आहे. हा आम्हालाही सुखद धक्का होता. कोणार्क मंदिराच्या आवारात यथेच्छ भटकून कामतमध्ये गरमागरम वडा, डोसा, पोंगल इ. वर ताव मारला. ही पोटपूजा करत असताना विठ्ठ्ल कामतांचं कौतुक चाललं होतं, माणूस फारच ग्रेट...मोठी व्हिजन आहे वगैरे गप्पा चालू होत्या. अनुषंगाने ‘इड्ली, ऑर्किड आणि मी’ या त्यांच्या पुस्तकाचा विषय निघाल्याशिवाय कसा राहील! एकूण काय तर कामत पुराण आळवत होतो आम्ही. हाईट म्हणजे जगन्नाथ पुरीत पोहचल्यानंतर तिथंही आम्हाला कामत दिसलं - चला रात्रीच्या खाण्याची मस्त सोय झाली.


पुरी बीचवर वाळूत खेळून, पाण्यात डूंबून, दिवसला ५६ प्रकारचे भोग (नैवेद्य) घेणाऱ्या जगन्नाथाचे दर्शन घेऊन (स्वत:ला भोग लावण्यासाठी) आमची पावलं कामतकडे वळली. पुन्हा आमचं कामतपुराण चालूच- खरं सांगायच तर कारण ही तसंच होतं. इथं ओरिसात कामतांसारख्या उद्योगी व्यावसायिकाची नितांत गरज आहे. व्यवसाय, पर्यावरण आणि नीतिमूल्यं यांची सांगड घालून कामतांनी जगभरात पाचशेहून अधिक हॉटेल उद्योग उभे केले आहेत.

आता योगायोग म्हणजे आम्ही कामत रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढतोय, त्यांचं कौतुक सुरुच आहे, आणि साक्षात विठ्ठल कामत आम्हाला दारात उभे दिसले!

यानंतर या आजिबात वेळ नसणाऱ्या अतोनात बिझी माणसाने आमच्यासोबत एक तास घालवला, ते नुकतंच सुरु करत असलेलं एक फाइव्ह स्टार हॉटेल फिरून दाखवलं, कोणार्कजवळ सुरु केलेलं कुशभद्रा आणि बंगोपसागराच्या संगमावर उभारलेलं ‘इकोव्हिलेज’ बघायला बोलावलं इ. इ. गोष्टी पुन्हा केंव्हातरी! तूर्त एवढंच सांगायचं आहे, की हिंदी सिनेमे अगदीच अशक्य योगायोग दाखवत नाहीत; त्यापेक्षा दुर्लभ योगायोग आपल्याही नशीबात असू शकतात...


(टीप: मी कामतांची आणि त्यांच्या रेस्टॉरंट्स ची फॅन आहे, बस्स! ही त्यांची जाहिरात नव्हे, आणि यात माझा कसलाही बिझिनेस इंटरेस्ट नाही!)

6 comments:

 1. वा वा. विठ्ठल कामतांबरोबर त्यांच्याच हॉटेलात त्यांच्या बरोबर १ तास वेळ घालवायला मिळणे यासारखं भाग्य ते काय. बाकी योगायोग फक्त सिनेमातच नसतात हे तुमचं म्हणणं एकदम पटलं

  ReplyDelete
 2. khupach nashibawaan aahaat tumhi.....mee hi hey pustak wachal aahe...its really inspiring..:)

  ReplyDelete
 3. खरं आहे हेरंब.मला सुद्धा हे पचवण्यासाठी ३-४ दिवस जावे लागले.

  ReplyDelete
 4. संगमनाथ, मला नशिबापेक्षा वेळ जुळून आली असं जास्त वाटतं.

  ReplyDelete
 5. वा ... कोणार्कला गेलो की आता खादाडी ची चिंता नाही ... हेहे... शिवाय न जाणो आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे भाग्य मिळेल... :)

  ReplyDelete
 6. Enjoyed reading your post.

  I once wrote a short letter to Kamat appreciating his book 'Idli....'. He prommptly sent a small gift! He is a good author and also a good marketing person!!

  Vivek

  ReplyDelete