Friday, February 12, 2010

ॠतु घरचा !


माझ्या घरात माझ्या माझ्या पुरते ॠतु चालू असतात-कंटाळा ऋतु, म्हणजे मला सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येतो. आंघोळीचा, झोपताना दिवे घालवण्याचा, स्वंयपाकाचा,घर आवरण्याचा, फोन उचलण्याचा,ब्लॉग बघण्याचा असो ही यादी नेहमीच लांब होत जाते.(बर्‍याच वेळेला हाच ॠतु चालू असतो!)

स्वयंपाक ऋतु, बगिचा ॠतु, सिनेमा ॠतु, सहलीचा ऋतु, इ.इ.

मागच्या २-३ आठवड्यात माझा वाचन ऋतु झाला. माझ्या वाचनात बरीच भर पडली.वाचन हा माझा छंद आहे असं सांगण्या इतंक काही मी वाचत नाही. पण मौसमच आहे मग काय विचरता-मी सपाटून पुस्तकांच्या मागे लागले. The White Tiger -Arvind Adiga, The Namesake -Jumpa Lahiri, Rebecca -Daphne DuMaurier, पण ल‌‍‍क्षात कोण घेतो? –ह.ना.आपटॆ. हुश्श. इतकं वाचलं.

व्हाईट टायगरला बूकर का मिळाले असेल हे माझ्या छोट्याश्या मेंदूला कळू शकलं नाही. (तुमच्यापैकी कुणाला कळंल असेल तर मला त्या पुस्तकाचे साहित्यमुल्य अवश्य सांगा.)एवठंच नाही तर या मेंदूने अशीही गुस्ताकी केली की एका शक्यतेचा विचार त्याने केला. तो असा क्राइम डायरीतल्या १-२ स्टोर्‍या एकत्र करून एखादा प्रकाशक शोधावा आणि आपण ही लिहावं काई-बाई. हमखास बूकर आपलाच.( मराठी माणसांने मोठी स्वप्न बघावी म्हणतात.)

बाकी तीन पुस्तकांनी खुप आनंद दिला.हा वाचन ऋतु बदलण्या आगोदर Imagining India आणि Midnight’s children यानां भेटायच आहे.

3 comments:

 1. माझ्या मते 'व्हाईट टायगर' ला बुकर मिळण्याचं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्लॅक कॉमेडी हाताळण्याची अरविंद अडिगाची sarcastic शैली. त्याने आपल्या निवडणुका, लोकशाही, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, खोटेपणा, सरकार, पोलीसखातं इ इ सगळ्यावर एवढे बेमालूमपाणे वार केले आहेत न की कित्येकदा ते वार होतानाही कळत नाहीत. पण जेव्हा कळतात तेव्हा अडिगाच्या शैलीला दाद दिल्यावाचून राहवत नाही. उदा. पान ८९ वरचा तो 'सर' म्हणण्याचा प्रसंग आणि ते वाक्य. त्या एका वाक्यात त्याने आपल्या सगळ्यांच्या मनोवृत्तीची छान काढली तर आहेच पण जाता जाता चीनमधील गर्भित हुकुमशाहीवरही तो भाष्य करतो. म्हणून म्हंटलं कि असे अनेक वार होताना (कदाचित) दिसत नाहीत. पण जेव्हा कळतात तेव्हा आपण गालातल्या गालात हसत तरी असतो किंवा उद्विग्न तरी झालेलो असतो.

  'व्हाईट टायगर' मला का आवडलं ते मी इथेही थोडक्यात सांगितलंय. वेळ मिळाला तर वाचा.

  http://harkatnai.blogspot.com/2009/09/grab-tiger.html

  ReplyDelete
 2. मिडनाईट वाचायला घेतला होतं. काही कळेना. ठेवून दिलं.

  ReplyDelete
 3. Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

  ReplyDelete